सभापतींच्या जिद्दीमुळे कामकाज वाया : कवळेकर 

work due Chairman the proceeding of assembly waste says Kavalekar
work due Chairman the proceeding of assembly waste says Kavalekar

पणजी : विधानसभा अधिवेशनात "फॉर्मेलिन' मुद्यावरील स्थगन प्रस्ताव चर्चेस न घेण्याची सभापतींनी जिद्द केल्याने काल व आजचा कामकाजाचा दिवस वाया गेला. इतकी वर्षे राज्यात फॉर्मेलिनचा वापर करून आयात झालेली मासळी गोमंतकियांनी खाल्ली त्याचा परिणाम आरोग्यावर होणार असल्याने स्थगन प्रस्तावावरील चर्चा महत्त्वाची होती.

राज्याच्या लोकांना लोकप्रतिनिधींच्या आरोग्याबाबत चिंता आहे तर लोकप्रतिनिधींनीही जनतेच्या आरोग्याबाबत काळजी घेणे अगत्याचे आहे. रासायनिक वापरून आंबे व केळी पिकविणाऱ्यांविरुद्ध सरकार त्वरित कारवाई करते. मात्र मासळीत फॉर्मेलिन असल्याचे उघड झाल्यावर मडगाव येथील 17 ट्रकांविरुद्ध सरकारने काय कारवाई केली याची माहिती उघड केली जात नाही.

अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 दिवसाचे होते मात्र मुख्यमंत्र्यांच्या आरोग्यामुळे ते चार दिवसांपुरतेच आवरते घेण्यास आम्ही विरोधकांनी त्याला संमती दिली होती मात्र फॉर्मेलिनमुळे तमाम गोमंतकियांच्या आरोग्याच्या प्रश्‍नासंदर्भात चर्चा करण्यास सभापती वेळ देऊ शकत नाही. हा प्रश्‍न गंभीर असल्याने विधानसभेतील इतर कामकाज बाजूला ठेवून त्यावर चर्चा व्हायलाच हवी.

सभागृहाचे नेते व सगळ्यांनीच हा प्रश्‍न चर्चेला घ्यायला हवा. काही सत्ताधारी आमदार व मंत्र्यांनी आज प्रश्‍नोत्तराच्या तासावेळी या गंभीर विषयावरील लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न केला असे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com