'बॉलिवूड सेलिब्रिटींकडे काम करणे भयानक अनुभव'

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

मुंबई - घर काम करणाऱ्या महिला पुरविण्याची सेवा देणाऱ्या एका ऑनलाईन संकेतस्थळाने वीस बॉलिवूड सेलिब्रिटीजवर बंदी घातली आहे. या संकेतस्थळाचे सहसंस्थापक अनुपम सिंघल यांनी सेलिब्रिटीच्या घरात काम करणाऱ्यांना कशी वाईट वागणूक दिली जाते, याची माहिती देणारा एक ब्लॉग लिहिला आहे.

सिंघल यांनी सेलिब्रिटीच्या घरात काम करणाऱ्यांच्या काही अनुभवांबद्दल लिहिले आहे. मात्र त्यांनी कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. कामासाठी बिहारमधून मुंबईत एका सेलिब्रिटीकडे काम करणाऱ्या महिलेला तिच्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी बिहारला जाऊ दिले नाही, तिने जाण्यापूर्वी काहीतरी पर्यायी व्यवस्था करून जावी अशी अट तिला घालण्यात आली. तर तीन कोटी रुपयांची मोटार चालविणाऱ्या एक सेलिब्रिटी व्यक्ती त्यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला जेवणही देत नसल्याचे सिंघल यांनी ब्लॉगमधून सांगितले आहे.

तिसऱ्या एका सेलिब्रिटीने त्यांच्याकडे काम करणाऱ्या महिलेचा शारीरिक छळ केल्याचे ब्लॉगमध्ये लिहिले आहे. या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली तर सतत पोलिस स्थानकात जाण्यास वेळ नसल्याचे सांगत त्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करण्यास मोलकरणीने नकार दिल्याचेही सिंघल यांनी लिहिले आहे. तर सिंघल यांच्या संकेतस्थळाबाबत नकारात्मक प्रतिक्रिया लिहून ट्विटरद्वारे चार लाख फॉलोअर्सपर्यंत पोचवेल, अशी धमकीही एका सेलिब्रिटीने दिल्याचा दावा सिंघल यांनी केला आहे.

Web Title: 'Working in Celebratiy house is very terrible experience'