ऑफिसमध्ये होतंय लैंगिक शोषण?; अॅप करणार मदत

वृत्तसंस्था
रविवार, 2 जून 2019

- लैंगिक शोषणाची तक्रार करता येणार या अॅपच्या माध्यमातून.

- संबंधित प्रकरणातील कायद्याविषयीची माहितीही मिळणार अॅपमधून.

नवी दिल्ली : कामाच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये अनेक लैंगिक शोषणाच्या घटना घडत असतात. भीतीपोटी अनेकदा अशी प्रकरणं उघड होत नाहीत. मात्र, आता अशा स्वरूपाच्या तक्रारींसाठी नवे अॅप लाँच करण्याचा विचार केला जात आहे. यासाठी दिल्लीतील नोएडा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. 

ऑफिसमध्ये होत असलेल्या लैंगिक शोषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या बैठकीत चर्चेअंती स्पष्ट झाले. त्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी इंट्रा आयटी (Intra IT) नावाचे नवे अॅप सुरु करण्याचा विचार करण्यात आला. या अॅपच्या माध्यमातून महिलांवरील लैंगिक शोषणाचे प्रकार, त्याची लक्षणं आणि ते रोखण्यासाठी कायद्यातील करावा लागणारा वापर या सर्व बाबींवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. त्यादृष्टीने ही माहिती या अॅपमध्ये देण्यात यावी, असा प्रस्ताव या बैठकीत ठेवण्यात आला आहे.  

तसेच ही सर्व माहिती 'कॉर्पोरेट सोशल रिस्पोन्सिबिलटीज्'अंतर्गत (सीएसआर) मिळू शकणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे अॅप तयार करण्याचा विचार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Working Women Will Able To Complain About Exploitation Via App