भारतामध्ये विद्युतीकरणाचे काम चांगल्याप्रकारे सुरू जागतिक बॅंकेचे मत 

वृत्तसंस्था
शनिवार, 5 मे 2018

भारतामध्ये विद्युतीकरणाचे काम अत्यंत चांगल्याप्रकारे सुरू असून, जवळपास 85 टक्के नागरिकांना आता वीज उपलब्ध झाली आहे, असे मत जागतिक बॅंकेने व्यक्त केले आहे.

वॉशिंग्टन : भारतामध्ये विद्युतीकरणाचे काम अत्यंत चांगल्याप्रकारे सुरू असून, जवळपास 85 टक्के नागरिकांना आता वीज उपलब्ध झाली आहे, असे मत जागतिक बॅंकेने व्यक्त केले आहे. भारतामध्ये 2010 ते 2016 दरम्यान दरवर्षी 30 दशलक्ष नागरिकांना वीज उपलब्ध झाली असून, ही आकडेवारी इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे, असे जागतिक बॅंकेने या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. 

देशातील अद्यापही 15 टक्के म्हणजे एक कोटी 25 लाख नागरिकांना वीजपुरवठा करण्याचे आव्हान अद्यापही कायम आहे. 2030 पूर्वी वीज पुरविण्याची उद्दिष्टपूर्ती भारत पूर्ण करेल, असे जागतिक बॅंकेचे अर्थशास्त्री विविएन फोस्टर यांनी सांगितले. देशातील सर्व खेड्यांमध्ये वीज पोचली असल्याचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक आठवडाही झाला नसतानाचा जागतिक बॅंकेचा हा अहवाल आला आहे. 

जागतिक बॅंकेच्या अहवालात म्हटले आहे, की देशातील 85 टक्के नागरिकांना वीज उपलब्ध झाली आहे. विद्युतीकरणात भारत उत्तम कामगिरी करीत आहे. भारतातील 85 टक्के नागरिकांना वीज उपलब्ध झाल्याचे आम्ही जाहीर करीत आहोत, असे फॉस्टर यांनी सांगितले. 

हा आकडा भारत सरकारच्या तुलनेत अधिक आहे. हा आकडा आपल्याला आश्‍चर्यचकित करणारा आहे. सरकारचा हा अहवाल 80 च्या दशकातील वाटतो, असे त्या म्हणाल्या. जागतिक बॅंकेचा अहवाल हा घरगुती सर्वेक्षणांवर आधारित आहे, तर सरकारचे आकडे हे अधिकृत उपयोगितेवर अवलंबून आहेत. भारत हा इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत विद्युतीकरण अधिक करीत आहे. 

Web Title: World Bank voted well in electrification work in India