Lumpy Disease : शेतकऱ्यांची चिंता मिटणार; लंपीवरही स्वदेशी लस तयार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pm narendra modi

Lumpy Disease : शेतकऱ्यांची चिंता मिटणार; लंपीवरही स्वदेशी लस तयार

World Dairy Summit : आत्मनिर्भर भारतासाठी केंद्र सरकारकडून अनेक पाऊलं उचलली जात आहेत. मध्यतंरी कोरोनावर मात करणाऱ्या भारतीय लसीच्या मोठ्या यशानंतर आता जनावरांच्या लंपी आजारावर भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी लस विकसित केली आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते ग्रेटर नोएडा येथील वर्ल्ड डेयरी समिटच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

पीएम मोदी म्हणाले की, अलीकडच्या काळात भारतातील अनेक राज्यांमध्ये लम्पी नावाच्या आजारामुळे पशुधनाचे नुकसान झाले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारसह विविध राज्य सरकार प्रयत्नशील आहेत. मात्र, आता काळजी करण्याचं कारण नसून भारतीय शास्त्रज्ञांनी या आजारासाठी स्वदेशी लसीची निर्मिती केली आहे. यावेळी त्यांनी देशातील प्राण्यांच्या सार्वत्रिक लसीकरणावरही भर देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही मोदींनी सांगितले. 2025 पर्यंत 100 टक्के प्राण्यांना फुट एंड माउथ डिजीज आणि ब्रुसलॉसिसच्या विरोधातील लस देण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा: Nitin Gadkari : पटोलेंच्या ऑफरवर गडकरींचं स्पष्टीकरण; म्हणाले,''मी...''

2014 पासून केंद्र सरकारने भारताच्या दुग्ध क्षेत्राची क्षमता वाढवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्याचा परिणाम आज दुग्धोत्पादनापासून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. 2014 मध्ये भारतात 146 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन झाले होते. आता ते 210 दशलक्ष टन झाले असून, यामध्ये सुमारे 44 टक्के वाढ झाल्याचे मोदी म्हणाले. भारत दुग्धजन्य प्राण्यांचा सर्वात मोठा डेटाबेस तयार करत आहे. डेअरी क्षेत्राशी निगडीत प्रत्येक जनावराचे टॅगिंग केला जात आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने डेअरी क्षेत्राशी संहंधित प्राण्यांची बायोमेट्रिक ओळख केली जात असून, याला पशु आधार असे नाव देण्यात आले आहे.

हेही वाचा: Lumpi Disease: देशात लंपी व्हायरसचा कहर; देशभरात 58 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू

महिलाच दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या खऱ्या कर्णधार : पंतप्रधान

भारतातील दुग्धव्यवसाय क्षेत्रातील ७० टक्के कर्मचार्‍यांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या क्षेत्राचा विकास करण्यामागे भारतीय महिलाच खऱ्या अर्थाने कर्णधार आहेत. एवढेच नाही तर भारतातील दुग्ध सहकारी संस्थांच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य महिला असल्याचेही यावेळी मोदींनी सांगितले.

Web Title: World Dairy Summit Indian Scientists Prepared Indigenous Vaccine For Lumpy Skin Disease Says Pm Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra Modi