Video : हेमा मालिनी म्हणतात, युद्ध थांबवतील ते मोदीच; जगाला आहे विश्वास

भारतासह जगातील अनेक देशांच्या नेत्यांनी हा प्रश्न चर्चेतून सोडवण्याचा सल्ला दिला आहे
पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदीsakal

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून, भारतासह जगातील अनेक देशांच्या नेत्यांनी हा प्रश्न चर्चेतून सोडवण्याचा सल्ला दोन्ही देशांच्या नेत्यांना दिला आहे. या सर्व परिस्थिवर भारताच्या भूमिकेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. एवढेच नव्हे तर, युक्रेनमधील परिस्थिती चिघळल्यानंतर युक्रेनच्या भारतातील राजदूत डॉ. इगोर पोलिखा (Dr Igor Polikha) यांनी पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत चर्चा करण्याचे आणि हे युद्ध थांबवण्यास सांगण्याचे कळकळीचं आवाहन केले होते. त्यानंतर भाजपच्या नेत्या हेमा मालिनी यांनी मोदींबद्दल मोठे विधान केले आहे. (World Leaders Wants Modi Come Ahead To Stop Russia Ukraine War.)

एएनआय या वृत्तसंस्थेने केलेल्या एका ट्वीटमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून, हे युद्ध संपुष्टात येण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यस्थी करत हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नव्हे तर, मोदीजींनी पुढाकार घेत हे युद्ध थांबवावे अशी संपूर्ण जगातील नेत्यांची इच्छा असल्याचे हेमा मालिनी यांनी म्हटले असून, संपूर्ण जगातील नेते भारताच्या पंतप्रधानांना आदर देत असल्याचे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com