World Soil Day 2023: 5 डिसेंबरला 'जागतिक मृदा दिवस' का साजरा केला जातो? जाणून घ्या

जागतिक मृदा दिवस का महत्वाचा आहे? जाणून घ्या इतिहास
World Soil Day 2023: 5 डिसेंबरला 'जागतिक मृदा दिवस' का साजरा केला जातो? जाणून घ्या

आपल्या दैनंदिन जीवनात मृदा अधिक महत्त्वाची आहे. आपल्याला मातीचे महत्त्व सांगण्यासाठी व मातीच्या गुणवत्तेची जाणीव करुन देण्यासाठी दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. परंतु, माती वाचवण्याची गरज का आहे ? हे देखील महत्त्वाचे असते. प्रदूषण व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे दरवर्षी मातीची गुणवत्ता ही कमी होत जाते.

मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अशा प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज मोठ्या प्रमाणावर होते. यासंदर्भात जागरुकता करण्याच्या दृष्टीने 2013 साली सयुंक्त राष्ट्राच्या महासभेत 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला.

मातीचे महत्त्व

जीवनासाठी माती अत्यावश्यक आहे.  कारण ती अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध यासह जीवनाच्या चार प्रमुख साधनांचा स्त्रोत आहे. त्यामुळे मातीचे संवर्धन आवश्यक आहे. याशिवाय माती वेगवेगळ्या प्रमाणात खनिजे, सेंद्रिय पदार्थ आणि हवा यांनी बनलेली असते.

जीवनासाठी ते महत्त्वाचे आहे कारण ते वनस्पतींच्या वाढीसाठी एक माध्यम आहे. अनेक कीटक आणि इतर जीवांचे घर आहे.

इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉईल सायन्सने 2002 मध्ये, दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा करण्याची शिफारस केली. थायलंडचे राजे एच.एम. भूमिबोल अदुल्यादेज यांचा 05 डिसेंबर रोजी जन्म झाला. ते या उपक्रमाच्या मुख्य समर्थकांपैकी एक होते.

FAO ने थायलंड राज्याच्या नेतृत्वाखाली जागतिक मृदा दिनाच्या औपचारिक स्थापनेला आणि जागतिक मृदा भागीदारीच्या चौकटीत जागतिक जागरुकता वाढवणारे व्यासपीठ म्हणून समर्थन दिले. जून 2013 मध्ये FAO च्या परिषदेने जागतिक मृदा दिनाला एकमताने मान्यता दिली. तसेच 68 व्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत अधिकृतपणे स्वीकारण्याची विनंती केली.

संयुक्त राष्ट्र महासभेने आपल्या 68 व्या अधिवेशनात डिसेंबर 2013 मध्ये, 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस म्हणून घोषित केला. 5 डिसेंबर 2014 रोजी पहिला जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला.

माती वाचवण्याचे मार्ग

जंगलतोडीवर बंदी घालावी.
वृक्ष लागवडीवर विशेष भर द्यावा.
बांधकाम आणि खाणकामात मातीची धूप होण्यापासून संरक्षण करण्यावर भर दिला पाहिजे.
शेताची नांगरणी उताराच्या विरुद्ध करावी.

माती प्रदूषण थांबविण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

प्लास्टिकचा वापर टाळा.

पर्यावरणास अनुकूल, बागकाम, साफसफाईची आणि वैयक्तिक काळजीची उत्पादने निवडा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com