जग बुडणार, मुंबईसह ही महत्त्वाची शहर जाणार पाण्याखाली (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

जगभरात 600 टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होत आहे. त्यामुळे सूर्याची ऊर्जा परावर्तित होत नाही. याचा परिणाम थेट जागतिक तापमानवाढीवर होत असून, दरवर्षी जगाचे तापमान 2 इंचाने वाढत आहे. यामुळे अंटार्क्टिका, ग्रीनलँड, हिमालयतील बर्फाचे पर्वत वेगाने वितळू लागले आहे.

मुंबई : जागतिक तापमानवाढीमुळे येत्या 30 वर्षांत जगबुडीचा धोका निर्माण झाला असून, संपूर्ण मानव जात यामुळे नष्ट होईल, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

जागतिक तापमानवाढ ही वेगाने होत असून, येत्या 30 वर्षांत याचा धोका अधिक होणार आहे. मुंबईसह जगभरातील 15 मोठी शहरे पाण्याखाली जाणार असा अंदाज आहे. शहरात घुसणारे पाणी हे याचे संकेत असल्याचे बोलले जात आहे. तापमानवाढीमुळे हिमनद्या झपाट्याने वितळत आहेत, याचा थेट परिणाम होत आहे. समुद्राच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईसह प्रमुख शहरे पाण्यासाठी जाणार हे निश्चित असल्याचे बोलले जात आहे. व्हेनिस शहर दरवर्षी इंचाने बुडत आहे.

जगभरात 600 टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होत आहे. त्यामुळे सूर्याची ऊर्जा परावर्तित होत नाही. याचा परिणाम थेट जागतिक तापमानवाढीवर होत असून, दरवर्षी जगाचे तापमान 2 अंशाने वाढत आहे. यामुळे अंटार्क्टिका, ग्रीनलँड, हिमालयतील बर्फाचे पर्वत वेगाने वितळू लागले आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचा पातळीत वाढ झाली आहे. मुंबई, शांघाय, न्यूयॉर्क, बिजिंग यासह प्रमुख शहरे पाण्याखाली जातील, अशी भिती व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world will be submerged with Mumbai and important city will be submerged