योगामुळे शांतता, मानवता निरोगी

जागतिक योग दिन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हैसूरमध्ये प्रतिपादन
आयएनएस विक्रमादित्य युद्धनौकेवर नौदलाच्या जवान तसेच कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली
आयएनएस विक्रमादित्य युद्धनौकेवर नौदलाच्या जवान तसेच कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासनांची प्रात्यक्षिके सादर केलीSakal

म्हैसूर - शारीरिक तंदुरुस्ती ही विविध देशांतील सहकार्याचा आधार बनत आहे आणि ती समस्या सोडविणारी बनू शकते. योगाने आपल्या विश्वात शांतता आणली असून मानवतेला निरोगी जीवनाची आशा त्यातून मिळाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. जागतिक योगदिनानिमित्त म्हैसूर पॅलेस येथे आयोजित केलेल्या मुख्य कार्यक्रमात कार्यक्रमात हजारो सहभागींसह त्यांनी योगासने केली. कार्यक्रमाच्या उद्‌घाटनानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, राज्यपाल बसवराज बोम्मई, केंद्रीय आयुषमंत्री सर्वानंद सोनोवाल आदी उपस्थित होते.

ऋषी, महर्षी आणि आचार्यांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, की योगसाधनेतून मिळणारी शांती केवळ वैयक्तिक नसून योगामुळे समाज, देश आणि जगात शांतता नांदते. संपूर्ण विश्व आपले शरीर व आत्म्यापासून सुरू होते, असा साधा मंत्र आपल्या ऋषींनी दिला. योग आपल्याला आपल्या आतील प्रत्येक गोष्टीबद्दल सजग बनवितो. जेव्हा आपण स्वत:बद्दल आणि आपल्या जगाबद्दल सजग होतो तेव्हा आपल्याला स्वत:मध्ये आणि जगामध्ये काय बदल घडवायला हवेत, हे लक्षात येते. मग या समस्या वैयक्तिक असोत की हवामान बदल, आंतरराष्ट्रीय संघर्षासारख्या असोत. म्हैसूरसारख्या आध्यात्मिक केंद्रांनी शतकानुशतके योगशास्त्राच्या ऊर्जेचा खतपाणी घातले. ही ऊर्जा जागतिक आरोग्याला दिशा देत आहे, असे गौरवोद्‌गारही पंतप्रधानांनी काढले.

ते पुढे म्हणाले, की काही वर्षांपूर्वी योग केवळ आध्यात्मिक केंद्रापुरता मर्यादित होता. मात्र, आज जगाच्या कानाकोपऱ्यात योग पोचला आहे. कोरोना साथीमुळे देश, खंडांच्या सीमा योगशास्त्राने ओलांडल्या आहेत. योगाचा संदेश संपूर्ण मानवजातीपर्यंत पोचविल्याबद्दलही त्यांनी संयुक्त राष्ट्रांचे आभार मानले. योगशास्त्रातील नवीन संधी तसेच कल्पनांसाठी तरुणांनी ‘स्टार्टअप योगा चॅलेंज’ स्वीकारण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना केले.

५० हजार जवानांनी साधला ‘योग’

जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हिमवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत-तिबेट सीमा पोलिस दलातील सुमारे ५० हजार जवानांनी शून्य अंशाखालील तापमानात १९ हजार फूट उंचीवर हिमालयात योगसाधना केली. चीन सीमेनजीकच्या लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातील चौक्यांवरील जवानांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

योग हा केवळ जीवनाचा भाग नाही तर ती जीवनपद्धती बनत आहे. तो विशिष्ट वेळ, ठिकाणापुरती मर्यादित करता कामा नये. आज योग आंतरराष्ट्रीय महोत्सव बनला आहे. तो कोणत्याही व्यक्तीपुरता मर्यादित नाही. तो संपूर्ण मानवतेसाठी आहे. त्यामुळे, यंदाच्या योगदिनाची थीम ‘मानवतेसाठी योग’ अशी आहे. योग करणारे समान चेतना व जाणीव व अंतर्गत शांती असलेली लाखो लोक जागतिक शांती निर्माण करतील.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com