500 किलो वजन असलेली महिला शस्त्रक्रियेसाठी मुंबईत

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - जगातील सर्वात जास्त वजन असलेली महिला म्हणून ओळख निर्माण झालेली इजिप्तमधील इमान अहमद ही 500 किलो वजनाची महिला शस्त्रक्रियेसाठी आज (शनिवार) मुंबईमध्ये दाखल झाली आहे.

नवी दिल्ली - जगातील सर्वात जास्त वजन असलेली महिला म्हणून ओळख निर्माण झालेली इजिप्तमधील इमान अहमद ही 500 किलो वजनाची महिला शस्त्रक्रियेसाठी आज (शनिवार) मुंबईमध्ये दाखल झाली आहे.

इमानचे वय 36 वर्षे असून ती शाईमा अहमद या तिच्या बहिणीसोबत मुंबईत आली आहे. तिला जन्मापासून हत्तीरोग झाला आहे. जन्मावेळी तिचे वजन तब्बल 5 किलो होते. तिच्या वजनामुळे ती गेल्या 25 वर्षांत घराबाहेरही पडू शकलेली नाही. तिला मुंबईत आणण्यासाठी इजिप्तमधील एअरबसने विशेष विमानाची सोय केली होती. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्‍टरांचे विशेष पथक सज्ज झाले आहे. त्यामध्ये हृदयरोगतज्ज्ञासह अन्य काही तज्ज्ञांचा समावेश आहे. ही शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहे.

Web Title: World's heaviest woman weighing 500 kilograms lands in Mumbai for bariatric surgery