मोदींच्या अपयशामुळे राहुल गांधीच भविष्यात पंतप्रधान: सुधींद्र कुलकर्णी

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जून 2018

सुधींद्र कुलकर्णा यांनी यापूर्वीही राहुल गांधी यांची स्तुती केलेली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले होते, की राहुल गांधी संसंस्कृत नेते आहेत. ते 2019 मध्ये पंतप्रधान झाले नाहीत, तरी 2024 मध्ये नक्की होणार. भाजपला काँग्रेसमुक्त भारत हवा आहे, पण राहुल गांधींनी कधीच भाजपमुक्त भारत हवा असे म्हटलेले नाही.  

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरसारखा मोठा मुद्दा सोडविण्यात अपयश आले आहे. त्यामुळेच भविष्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधानपदावर बसलेले पाहणे मला आवडेल, असे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे सहयोगी सुधींद्र कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

मुंबईत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना सुधींद्र कुलकर्णी यांनी राहुल गांधी यांची स्तुती केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खर्शिद यांच्या 'स्पेक्ट्रम पॉलिटिक्स' या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमात कुलकर्णी म्हणाले, ''पाकिस्तान आणि चीन सारख्या देशांसोबत असेलल्या वादाच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यात मोदींना अपयश आले आहे. त्यामुळे भविष्यात अच्छे दिन वाले नेता म्हणून राहुल गांधी हेच आहेत. राहुल गांधी युवा असून, ते एक विचारवंत आहेत. सध्याच्या काळात प्रेम, आदर आणि जिव्हाळ्याने बोलणारा एकही राजकीय नेता नाही. राहुल गांधी हे एकमेव असे बोलणारे नेते आहेत. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारताचे शेजारी असलेल्या पाकिस्तान, चीन, बांगलादेश या देशांशी चर्चा करून मोठ्या समस्यांवर तोडगा काढणे गरजेचे आहे. राजीव गांधी यांनी विरोधात असताना अफगाणिस्तानमध्ये जाऊन चर्चा केली होती. तसेच मोदींना अपयश आल्यामुळे राहुल गांधी यांनी पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशला जाऊन प्रश्न सोडविले पाहिजेत.''

सुधींद्र कुलकर्णा यांनी यापूर्वीही राहुल गांधी यांची स्तुती केलेली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले होते, की राहुल गांधी संसंस्कृत नेते आहेत. ते 2019 मध्ये पंतप्रधान झाले नाहीत, तरी 2024 मध्ये नक्की होणार. भाजपला काँग्रेसमुक्त भारत हवा आहे, पण राहुल गांधींनी कधीच भाजपमुक्त भारत हवा असे म्हटलेले नाही.  

Web Title: Would like to see Rahul Gandhi as future Prime Minister says Sudheendra Kulkarni