Wrestlers Protest: कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी प्रियंका गांधी जंतरमंतरवर; सातव्या दिवशीही आंदोलन सुरूच

 Wrestlers Protest ,Wrestlers Protest Jantar Mantar
Wrestlers Protest ,Wrestlers Protest Jantar Mantaresakal

Wrestlers Protest: ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंच्या याचिकेची दखल घेत सुप्रीम कोर्टानं भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी देखील सुप्रीम कोर्टात दिल्ली पोलीस आजच त्यांच्यावर गुन्हा दाखल करतली अशी माहिती दिली.

यानंतर शनिवारी खेळाडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी शनिवारी सकाळी जंतरमंतरवर जात खेळाडूंची भेट घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुडाही होते. जंतरमंतरवर खेळाडूंच्या धरणे आंदोलनाचा शनिवारी सातवा दिवस आहे.

 Wrestlers Protest ,Wrestlers Protest Jantar Mantar
APMC Election 2023: प्रतिष्ठेच्या लढाईत विखे पाटीलांना मोठा धक्का; राहुरी बाजार समितीत पुन्हा तनपुरेंची सत्ता

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर दोन एफआयआर नोंदवले. यामध्ये एका अल्पवयीन कुस्तीपटूच्या तक्रारीवरून बृजभूषण यांच्यावर पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

आंदोलक खेळाडूंची याचिका सोमवारी सुप्रीम कोर्टाला प्राप्त झाली. या याचिकेत खेळाडूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या याचिकेची दखल घेत कोर्टानं दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली असून आज सुनावणी दरम्यान दिल्ली पोलिसांच्यावतीनं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी आजच बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती दिली.

 Wrestlers Protest ,Wrestlers Protest Jantar Mantar
Jitendra Awhad: “निरंजन डावखरेंनी मुस्लीम भगिनीशी…”, लव्ह जिहादच्या बॅनरवरून आव्हाडांची प्रतिक्रिया

ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राचं खेळाडूंना समर्थन

खेळाडूंच्या आंदोलनाला आता अनेक राजकीय नेते समर्थनार्थ पुढे येऊ लागले आहेत. दरम्यान, आता कुस्तीपटूंना ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राची देखील साथ मिळाली आहे.

नीरज चोप्राने पैलवानांच्या समर्थनार्थ ट्विट केले की, "ब्रिजभूषण सिंगच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा.

आमच्या खेळाडूंना रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करताना पाहून मला वेदना होत आहेत. त्यांनी आमच्या महान राष्ट्राचे प्रतिनिधित्व करून आम्हाला अभिमान वाटावा यासाठी खूप चांगले काम केले आहे."

"एक राष्ट्र म्हणून प्रत्येक माणसाची अखंडता आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. जे घडत आहे ते कधीच घडू नये. हा एक संवेदनशील मुद्दा आहे आणि तो निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने हाताळला गेला पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून न्याय मिळवून द्यावा."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com