

PM Narendra Modi hosted a special vegetarian dinner for BRICS leaders at Bharat Mandapam, featuring a diverse selection of Indian dishes and a cultural programme.
esakal
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संध्याकाळी भारत मंडपम येथे ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झालेल्या नेते, प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींसाठी विशेष मेजवानीचे आयोजन केले. भारताच्या वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती आणि पाककलेचे दर्शन घडविण्यासाठी या मेजवानीत खास शाकाहारी पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. यावेळी ‘नवरस: सामायिक भावनांचे विश्व’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला.