
Tauktae नंतर आणखी एक वादळ धडकणार; हवामान विभागाचा अंदाज
नवी दिल्ली : गेल्या आठवड्यापासून थैमान घातलेल्या 'तौत्के चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) समुद्र किनारपट्टीवरील राज्यांना तडाखा दिला. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, गोवा या भागांना अधिक फटका बसला. आता यानंतर आणखी एका चक्रीवादळाचा धोका असल्याचे भारतीय हवामान खात्याने (India Meteorological Department) जाहीर केले आहे. मात्र या चक्रीवादळाचा फटका अंदमान निकोबार बेट, (andaman nicobar ireland) ओडिशा (odisha) आणि पश्चिम बंगाल (west bengal) या प्रदेशांना तडाखा बसण्याची शक्यता आहे. (yaas cyclone in india from next week said IMD)
'तौत्के चक्रीवादळामुळे' महाराष्ट्रासह, (maharashtra) गुजरात, गोवा (goa) या राज्यांत जीवित आणि वित्तहानी झाली आहे. कोरोनामुळे परिस्थिती हालाखीची असताना वादाळामुळे अनेकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीतून देश सावरला की नाही तोच येत्या पाच दिवसांत आणखी एक वादळ भारताला धडकण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा: ज्येष्ठ चित्रपट संकलक गोविंद दलवाडी यांचे निधन
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३ आणि २४ मे च्या दरम्यान 'Yaas' हे चक्रीवादळ बंगालच्या खाडीला धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला 'यास' हे नाव ओमानकडून देण्यात आले आहे. हवामानातील सततचे बदल आणि तापमान वाढीमुळे अशी चक्रीवादळे येत असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. (Yaas from Oman)
भारतीय हवामान विभागातील चक्रीवादळ प्रमुखांच्या म्हणण्यानुसार, येत्या आठवड्यात पूर्व बंगालच्या खाडीत कमी दबाव क्षेत्र तयार होणार आहे. बदलणाऱ्या स्थितीवर हवामान विभाग लक्ष ठेवून आहे. गेल्या वर्षी पश्चिम बंगालला amphan चक्रीवादळाने तडाखा दिला होता. यामध्ये कोलकाता, 24 नॉर्थ आणि साऊथ परगण्यात मोठे नुकसान झाले होते.
हेही वाचा: सात महिन्यांत तब्बल ८० रुपयांनी वाढल्या खाद्यतेलाच्या किंमती
Web Title: Yaas Cyclone In India From Next Week Said
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..