ज्येष्ठ चित्रपट संकलक गोविंद दलवाडी यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Govind Dalwadi

ज्येष्ठ चित्रपट संकलक गोविंद दलवाडी यांचे निधन

मुंबई; कटी पतंग, प्यार झुकता नही, आराधना, दो रास्ते अशा काही लोकप्रिय चित्रपटांसाठी संकलनाचे काम करणारे ज्येष्ठ चित्रपट संकलक गोविंद दलवाडी यांचे नुकतेच न्यूमोनियाने रुग्णालयात निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलं, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.

ज्येष्ठ चित्रपट संकलक धरम वीर यांच्याकडे गोविंद दलवाडी यांनी संकलनाचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. निर्माते व दिग्दर्शक शक्ती सामंता यांच्या काश्मीर की कली या चित्रपटासाठी सहायक संकलकाचे सुरुवातीला त्यांनी काम केले. त्यांच्या कामावर शक्ती सामंता कमालीचे खुश झाले आणि त्यांनी अॅन इव्हिनिंग इन पॅरिस या चित्रपटाच्या संकलनाची स्वतंत्ररीत्या जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. त्यानंतर एकापाठोपाठ एक हिंदी चित्रपटांच्या संकलनाचे काम त्यांनी केले.

हेही वाचा: The Family Man 2: प्रियामणिचा जबरदस्त लूक पाहिलात?

हेही वाचा: Video : रुबिना म्हणतेय, 'या' पाच गोष्टींमुळे कोरोनावर लवकर केली मात

नगीना, मंगल पांडे ः द रायझिंग, अमर प्रेम, हीर रांझा आदी अनेक चित्रपटांच्या संकलनाचे  त्यांनी काम केले. शक्ती सामंतांबरोबरच राज खोसला, के. सी. बोकाडिया अशा हिंदीतील कित्येक मान्यवर मंडळींच्या चित्रपटांच्या संकलनाचे काम त्यांनी केले.

Web Title: Senior Film Editor Govind Dalwadi Passed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..