विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हांनी मागितला अडवाणी, मोदींकडं पाठिंबा

Yashwant Sinha
Yashwant Sinhaesakal
Summary

एनडीएनं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिलीय.

Presidential Election : पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी भाजपचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी (Lalkrishna Adwani), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडं पाठिंबा मागितलाय. 84 वर्षीय सिन्हा हे अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अर्थ आणि परराष्ट्र मंत्री राहिले आहेत.

केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएनं (NDA) 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवारी दिलीय. मुर्मू यांनी काल पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मुर्मू यांना अनेक बिगर एनडीए पक्षांचाही पाठिंबा आहे, त्यामुळं त्यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार सिन्हा हेही रिंगणात उभे आहेत. ते सतत प्रचाराची मोहीम राबवत आहेत.

यशवंत सिन्हा यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संपर्क साधला. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, त्यांनी दोन्ही नेत्यांना त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय. सिन्हांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे आशीर्वादही मागितले. अडवाणी अटल सरकारमध्ये उपपंतप्रधान होते आणि त्याच सरकारमध्ये सिन्हा केंद्रीय मंत्री होते. प्रदीर्घ काळ भाजपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी पक्ष सोडलाय. मोदी सरकार-1 मध्ये त्यांचे पुत्र जयंत सिन्हा अर्थमंत्री होते. जयंत सिन्हा अजूनही भाजपचे खासदार आहेत, पण मोदी सरकार-2 मध्ये त्यांना मंत्री करण्यात आलं नाहीय.

Yashwant Sinha
दहशतवादाच्या मुद्यावर 'राजकारण' करु नका; ब्रिक्स सदस्य राष्ट्रांना मोदींचा सल्ला

सिन्हा यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही फोन केला. सिन्हा यांनी त्यांना आठवण करून दिली की, त्यांचा पक्ष जेएमएमनं सामान्य विरोधी उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता. सिन्हा शुक्रवारी झारखंडमधून प्रचाराला सुरुवात करणार होते, पण आता जेएमएमनं आदिवासी नेत्या द्रौपदी यांना पाठिंबा दिलाय. दरम्यान, सिन्हा सोमवार, 27 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी विरोधी पक्षातील दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Yashwant Sinha
द्रौपदी मुर्मू यांच्या पाठिंब्यासाठी जेपी नड्डांचा थेट सोनिया गांधींना फोन

द्रौपदी मुर्मू यांच्या पाठिंब्यासाठी जेपी नड्डांचा सोनिया गांधींना फोन

जेपी नड्डा यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi), मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरी, फारुख अब्दुल्ला आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्याशी फोनवरुन चर्चा केलीय. नड्डा यांनी या सर्वांना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकारण करू नये, राष्ट्र आणि समाजाच्या हितासाठी बिनविरोध निवड झाली पाहिजे, असं नड्डा यांनी सर्व नेत्यांना सांगितल्याचं बोललं जातंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com