यासिन मलिकची चार महिन्यांनंतर सुटका

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

यासिन गेल्या चार महिन्यांपासून श्रीनगरमधील मध्यवर्ती कारागृहात होता, अखेर आज त्याची सुटका करण्यात आली. काश्‍मीर खोऱ्यातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्याला अटक करण्यात आली होती. यासिन मलिक सायंकाळपर्यंत त्याच्या घरी पोचणार आहे.

श्रीनगर - जम्मू काश्‍मीर लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) नेता मोहम्मद यासिन मलिक याची आज चार महिन्यांनंतर कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणी आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना ठार मारल्यानंतर सुरक्षारक्षकांनी यासिन मलिकला 8 जुलैला मैसुमा येथून अटक केली होती.

यासिन गेल्या चार महिन्यांपासून श्रीनगरमधील मध्यवर्ती कारागृहात होता, अखेर आज त्याची सुटका करण्यात आली. काश्‍मीर खोऱ्यातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्याला अटक करण्यात आली होती. यासिन मलिक सायंकाळपर्यंत त्याच्या घरी पोचणार आहे. कोठीबाग पोलिस ठाण्यातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची रवानगी श्रीनगर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. सुरक्षा दलांनी हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्‍या बुऱ्हाण वणीला ठार मारल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात झालेल्या हिंसाचारात 85 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक जखमी झाले आहेत.

Web Title: yasin malik released from jail after four months