
केदारनाथाचं दर्शन घेऊन परतताना हेलिकॉप्टर कोसळून रविवारी भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत यवतमाळमधील पती-पत्नीसह त्यांच्या २ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. राजकुमार जयस्वाल आणि श्रद्धा जयस्वाल असं पती पत्नीचं नाव आहे. तर काशी असं त्यांच्या चिमुकल्या मुलीचं नाव आहे. अपघातात सर्वांचे मृतदेह होरपळले असून मृतांची ओळख पटवणं कठीण आहे. डीएनए तपासणी करून मृतदेहाची ओळख पटवली जाणार आहे. यासाठी श्रद्धा यांचा भाऊ आकाश बोरले आणि राजकुमार जयस्वाल यांचा भाऊ पीयूष हे केदारनाथला रवाना झालेत.