माओवाद्यांच्या हल्ल्यात दुप्पट संख्येने जवान शहीद

टीम ई सकाळ
मंगळवार, 25 एप्रिल 2017

गेल्या चार महिन्यात सुरक्षा दलाचे तब्बल 72 जवान माओवाद्यांशी लढताना शहीद झाले आहेत. यापूर्वी 2010 मध्ये सुरक्षा दलाचे 153 जवान शहीद झाले होते. 

नवी दिल्ली : माओवाद्यांच्या प्रभावक्षेत्रात सुरक्षेची कामगिरी बजावणाऱया दलांसाठी 2017 हे गेल्या सात वर्षांतील सर्वात घातक वर्ष ठरले आहे. गेल्या चार महिन्यात सुरक्षा दलाचे तब्बल 72 जवान माओवाद्यांशी लढताना शहीद झाले आहेत. 

यापूर्वी 2010 मध्ये सुरक्षा दलाचे 153 जवान शहीद झाले होते. 

इंडिया स्पेन्ड या वेबसाईटने साऊथ एशिया टेररिझम पोर्टल (एसएटीपी) या संस्थेच्या आकडेवारीचा हवाला देऊन यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. 

केंद्रीय राखीव सुरक्षा दलावर (सीआरपीएफ) 24 एप्रिलला माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल 26 जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सीआरपीएफच्या 74 व्या बटालियनवर सुमारे 300 नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. 

माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद होणाऱया जवानांची संख्या
वर्ष शहीद जवानांची संख्या
2005 48
2006 55
2007 182
2008 67
2009 121
2010 153
2011 67
2012 36
2013 45
2014 55
2015 41
2016 36
2017 72
Web Title: The year 2017 most brutal for security forces and CRPF in last seven years