Year Ender : वर्क फ्रॉम होम पासून ते ऑफीसवापसी पर्यंत अशी बदलली लोकांची लाईफस्टाईल

Year Ender : वर्क फ्रॉम होम पासून ते ऑफीसवापसी पर्यंत अशी बदलली लोकांची लाईफस्टाईल

एक नवी हायब्रीड जीवनशैली आणि कार्यशैली उदयाला आली आणि आता रुळलीसुद्धा

Hybrid Lifestyle Look Back : कोरोनानंतर सुरू झालेलं न्यू नॉर्मल सुरूवातीला अनेकांना जड गेलं. पण नंतर तेच पथ्यावरही पडलं. एक नवी हायब्रीड जीवनशैली आणि कार्यशैली उदयाला आली आणि आता रुळलीसुद्धा.

कोरोना काळात वर्क फ्रॉम होम सुरू झालं, ही जीवनशैली अनेकांना सुरूवातीला जमली नाही. पण नंतर त्यात असे रुळले की, परत ऑफिसला जाऊन काम करणं नकोसं वाटलं. या दोन वर्षांच्या काळात सगळ्यांच्याच आयुष्यात मानसिक, भावनिक, शारीरिक, आर्थिक चढउतार झाले. त्यामुळेच २०२२ हे अनेकांसाठी नवी, वेगळी सुरूवात करणारं ठरलं.

Year Ender : वर्क फ्रॉम होम पासून ते ऑफीसवापसी पर्यंत अशी बदलली लोकांची लाईफस्टाईल
Year Ender 2022: २०२२ मध्ये 'या' टॉप-५ बाईक्सने गाजवले मार्केट, जाणून घ्या काय आहे खास

मूनलायटिंगचा ट्रेंड

कोरोना काळात बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे पगार निम्म्यावर आले. त्यामुळे काहींनी नोकरी सोडून गावी परत जाऊन शेती करणं किंवा काही व्यवसाय करणं पसंत केलं. तर दुसरीकडे काहींनी असलेली नोकरी टिकवत खर्च भागवण्यासाठी मून लायटिंगचा पर्याय स्वीकारला. म्हणजे एकाचवेळी दोन वेगळ्या कंपन्यांसाठी काम करणं, नोकरी करणं.

Year Ender : वर्क फ्रॉम होम पासून ते ऑफीसवापसी पर्यंत अशी बदलली लोकांची लाईफस्टाईल
Year Ender २०२२ : राजकारण ते मनोरंजन; २०२२ मधील कायम लक्षात राहणाऱ्या १० मोठ्या घटना

न्यू नॉर्मलनंतर पुन्हा बदल

कोरोना काळात मून लायटिंग मोठ्या कंपन्यांनीही काही प्रमाणात स्वीकारलं होतं. पण करोनातून बाहेर आल्यावर पुन्हा पहिल्यासारखे रुळू लागल्यावर जसं न्यू नॉर्मल रुळलं तसं यावर आक्षेप घेतला जाऊ लागला. पण अचानक एक काम सोडणं शक्य नसल्याने अनेकाची द्विधा मनःस्थितीपण झाली.

ऑफिसवापसी जड

वर्ष-दोन वर्ष वर्क फ्रॉम होमची सवय झालेल्या कर्मचाऱ्यांची ऑफिसवापसी करणं, एचआरला जड झालं. मग कर्मचाऱ्यांनी ऑफिसला परत यावं, यासाठी निरनिराळे फंडे आजमावले जाऊ लागले. तरीही फार फरक पडला नाही. मग सुवर्णमध्य साधला गेला. आठवड्यातील ५ पैकी ३ दिवस ऑफीस २ दिवस घर असं काँबिनेशन अनेकांना सोयिस्कर वाटू लागलं. सतत घरी राहून येणारी मरगळ दूर झाली तर ऑफीसला गेल्यावर घराचं काय याचा प्रश्न पडणाऱ्यांचा ताणही काहीप्रमाणात कमी झाला.

बदलातील आशावाद

संपूर्ण इंडस्ट्रीनेच नव्याने उभारी घेतल्याने आर्थिक स्थितीही नॉर्मलवर येऊ लागल्याने या वर्षात बऱ्याच प्रमाणात सावकाश का असेना पण मानसिक बदल, सुधारणा दिसू लागली असून मानसशास्त्रज्ञ आशावाद व्यक्त करत असताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com