ओडिशा सरकारचे यंदाचे अधिवेशन होणार डिजिटल माध्यमातून

स्मृती सागरिका कानुनगो
Saturday, 23 January 2021

पेपरलेस कारभाराच्या दृष्टीने आणखी एक पुढचे पाऊल टाकत ओडिशा सरकारने यंदाचे अधिवेशन डिजिटल माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती आज विधानसभेचे सभापती सूर्या नारायण पत्रा यांनी दिली.

भुवनेश्‍वर - पेपरलेस कारभाराच्या दृष्टीने आणखी एक पुढचे पाऊल टाकत ओडिशा सरकारने यंदाचे अधिवेशन डिजिटल माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती आज विधानसभेचे सभापती सूर्या नारायण पत्रा यांनी दिली. 

'लशीच्या यशात माझं काय श्रेय नाही'

ओडिशा विधानसभेचे अर्थसंकल्पी अधिवेशन फेब्रुवारीत सुरू होणार असून हे अधिवेशन पेपरलेस असणार आहे. सभागृहातील सदस्य हे अधिवेशनाला त्यांच्या सभागृहातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील. आमदारांना ऑनलाइनच्या माध्यमातून प्रश्‍न मांडण्याची सुविधा उपलब्ध असेल. ‘नावा’ ॲप्स (इ-विधान ॲप्लिकेशन)च्या माध्यमातून आमदार विधानसभा कार्यालयाला प्रश्‍न विचारू शकतात. त्यानंतर संबंधित विभागाकडून आणि आमदारांकडून त्याच माध्यमातून उत्तर दिले जाईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अधिवेशनाचे संपूर्ण कामकाज मोबाईल ॲपच्या माध्यमातून चालणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प देखील ऑनलाइन पद्धतीने मांडण्यात येणार आहे. तत्पूर्वी विधानसभेच्या सभापतींनी इ-विधानसभा आधुनिकीकरणासाठी जवळपास ८.५६ कोटी रुपये खर्च आल्याचे सांगितले. यासाठी केंद्र सरकारने ६० टक्के वाटा उचलला असून उर्वरित ४० टक्के खर्च राज्य सरकारने केला आहे.

Video:हत्तीच्या अंगावर फेकली पेटती टायर; अमानुष प्रकाराने हत्तीचा मृत्यू

कोव्हॅक्सिन लसची दुसरी बॅच आठवडाभरात
भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस येत्या आठवड्यात पोचणार असून ओडिशात आतापर्यंत १,१३,६२३ जणांना लस दिली आहे. यात कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लशीचा समावेश आहे. काल ४३६ ठिकाणी ४४,८८० जणांना लस दिली गेली. दुसऱ्या बॅचमध्ये कोव्हॅक्सिनची १,४९,७६० लस दाखल होणार असल्याचे राज्य आरोग्य  खात्याचे संचालक विजय पाणीग्रही यांनी सांगितले. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This years convention of Odisha government held through digital medium