'लशीच्या यशात माझं काय श्रेय नाही'

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 22 January 2021

कोणतीही लस बनविण्यामागे वैज्ञानिक प्रक्रिया व शास्त्रज्ञांचे कठोर परिश्रम असतात. कोरोना लसही त्याला अपवाद नाही व लसीकरणाबाबतही शास्त्रज्ञ जसे सांगतील तसेच सरकार करेल हे सरकारने आधीच ठरवले होते. यात राजकारण नसते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारांना आज उत्तर दिले व लशीच्या यशात आपले श्रेय काहीही नाही, असेही सांगितले.

नवी दिल्ली - कोणतीही लस बनविण्यामागे वैज्ञानिक प्रक्रिया व शास्त्रज्ञांचे कठोर परिश्रम असतात. कोरोना लसही त्याला अपवाद नाही व लसीकरणाबाबतही शास्त्रज्ञ जसे सांगतील तसेच सरकार करेल हे सरकारने आधीच ठरवले होते. यात राजकारण नसते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारांना आज उत्तर दिले व लशीच्या यशात आपले श्रेय काहीही नाही, असेही सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशात कोरोना लसीकरण मोहिमेत आजपावेतो १० लाखांहून जास्त डॉक्‍टर आणि आरोग्य सेवकांना लस टोचण्यात आली आहे. मात्र अनेक राज्यांत लसीकरणास अल्प प्रतिसादाच्या व लस घेण्यास कोणी तयार होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. विरोधी पक्ष पहिल्यापासूनच कोरोना लशीबाबत शंका घेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी लशीबाबत पुन्हा आश्‍वस्त केले. कोणत्याही लशीचे साईड इफेक्‍ट असतात तसेच याही लसीचे काहींना जाणवत आहेत. मात्र लस पूर्ण सुरक्षितच आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

केंद्रीय कृषीमंत्री शेतकऱ्यांवर भडकले; 11 वी बैठकही तोडग्याशिवाय

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या वाराणसी मतदारसंघात लसीकरण झालेले व ते ज्यांना होणार आहे अशा आरोग्य सेवकांशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, की २०२१ चा प्रारंभ अतिशय शुभ संकल्पांनी झाला आहे. काशीबाबत असे सांगतात की येथे शुभ घटना सिद्धीत परावर्तित होतात. याच सिद्धीचा परिणाम म्हणजे जगातील सर्वांत मोठे लसीकरण देशात सुरू झाले आहे. देशाला कोरोना लस देण्याचे पूर्ण श्रेय माझे नसून शास्त्रज्ञांचे व डॉक्‍टरांचे आहे असे ते म्हणाले.

हाथी मेरे साथी! हत्तीच्या मृत्युनंतर फॉरेस्ट रेंजर ढसाढसा रडला; VIDEO VIRAL

एका पूर्ण अनोळखी जैविक शत्रूविरुद्ध लढण्यासाठी ही लस सिद्ध केली. कोरोना लसीचा निर्णय राजकीय असू शकत नाही, तसा तो नव्हता व वैज्ञानिकांच्या सल्ल्यानंतरच सरकारने यात पावले उचलली आहेत. भारतातील दोन्ही कोरोना लशी पूर्ण वैज्ञानिक प्रक्रियेचे पालन करूनच तयार करण्यात आल्या आहेत. लसीकरणही वैज्ञानिक पद्धतीनेच केले जात आहे. कोरोना लशीबाबत भारत संपूर्ण आत्मनिर्भर आहे. भारताने प्रथम लस बनवली व जगातील अनेक देशांना आपण ती पुरवीत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm modi says covid vaccine success because of scientist