बळ्ळारी खाण गैरव्यवहारातून येडियुरप्पांना दिलासा

वृत्तसंस्था
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016

कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना 2010 मध्ये येडियुरप्पा यांनी सरकारी जमीन खाणकामासाठी देत 40 कोटींची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता. येडियुरप्पा यांच्यासह त्यांची दोन मुले आणि जावई तसेच जेएसडब्लू स्टील कंपनीचे अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले होते.

बंगळूर - बेळ्ळारी अवैध खाण गैरव्यवहार प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा व अन्य काही जणांना आज (बुधवार) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना 2010 मध्ये येडियुरप्पा यांनी सरकारी जमीन खाणकामासाठी देत 40 कोटींची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता. येडियुरप्पा यांच्यासह त्यांची दोन मुले आणि जावई तसेच जेएसडब्लू स्टील कंपनीचे अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले होते. तेव्हापासून सीबीआयच्या विशेष न्यायालयात यांच्याविरोधात खटला चालविण्यात येत होता. अखेर आज यांना मोठा दिलासा मिळत या गैरव्यवहारप्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकालानंतर येडियुरप्पा यांनी सत्यमेव जयते असे ट्विट केले आहे.

येडियुरप्पा यांनी दक्षिणेकडील राज्यांमध्ये 2008 मध्ये प्रथमच भाजपचे सरकार स्थापन केले होते. जुलै 2011 लोकायुक्तांनी दाखल केलेल्या अहवालावरून त्यांच्याविरोधात खाण गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदही गमवावे लागले होते.

Web Title: Yeddyurappa, others acquitted in Rs 40 crore bribery case