येडियुरप्पा-वाजपेयी तुलना कितपत योग्य ?

शनिवार, 19 मे 2018

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर मोठ्या राजकिय घडामोडीनंतर अवघ्या 2 दिवसात येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला. आज कर्नाटक विधानभेत त्यांनी राजीनामा देण्यापूर्वी भावनिक भाषण केले. हे भाषण केल्यानंतर मात्र 1996 साली अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यापूर्वी लोकसभेत केलेल्या भाषणाची आठवण झाली आणि त्यानंतर मात्र वाजपेयी आणि येडियुरप्पा यांच्या तुलनेला सोशल मिडियावर उधाण आले. परंतु, ही तुलना कितपत योग्य आहे ?

बंगळूर - कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर मोठ्या राजकिय घडामोडीनंतर अवघ्या 2 दिवसात येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला. आज कर्नाटक विधानभेत त्यांनी राजीनामा देण्यापूर्वी भावनिक भाषण केले. हे भाषण केल्यानंतर मात्र 1996 साली अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यापूर्वी लोकसभेत केलेल्या भाषणाची आठवण झाली आणि त्यानंतर मात्र वाजपेयी आणि येडियुरप्पा यांच्या तुलनेला सोशल मिडियावर उधाण आले. परंतु, ही तुलना कितपत योग्य आहे ?

२२ वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांनी एक मत कमी पडल्यावर घोडेबाजार न करता नैतिकतेला प्राधान्य देत पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. परंतु, आज जरी येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला असला तरी तो वाजपेयी यांच्याप्रमाणे नैतिकतला धरुन कितपत आहे. परिस्थिती १९९६ सारखी असली आणि अटलजींसारखे भावनिक भाषण येडियुरप्पा यांनी केले असले तरी त्यांना सहानुभूती मिळण्याचे कारण नाही. या दोन दिवसांत येडियुरप्पा यांच्याकडुन आमदारांच्या घोडेबाजारीसाठी केलेला प्रयत्न दिसून आला. त्याचबरोबर पैशाची उधळण आणि विरोधी पक्षांच्या आमदारांना मंत्री पदाचे दाखवलेले अमिष हेही उघडकीस आले. 

येडियुरप्पांनी भाजपला पाच वर्षांपूर्वी लाथ मारली होती हेही विसरता येणार नाही. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असताना भारतीय जनता पक्षाला मुख्यमंत्री पदासाठी दुसरा नेता मिळाला नाही हासुद्धा तेवढाच चिंतनाचा विषय आहे. 1996 साली मात्र वाजपेयी यांनी दिल्लीत क्रमांक १चा पक्ष असूनही सत्ता न स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. तोच शहाणपणा इथेही येडियुरप्पा यांनी दाखवायला हवा होता.

Web Title: Yeddyurappa-Vajpayee comparisons ?