सिद्धरामय्यांवर येडियुरप्पाचे टीकास्त्र

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

बंगळूर : बंगळूरमध्ये उभारण्यात येत असलेल्या लोखंडी उड्डाण पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आज भाजपचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केला.

बंगळूर : बंगळूरमध्ये उभारण्यात येत असलेल्या लोखंडी उड्डाण पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आज भाजपचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केला.

बंगळुरात दोन हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, त्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 150 कोटी रुपयांची दलाली घेतली असल्याचा आरोप येडियुरप्पा यांनी केला.

सिद्धरामय्या यांच्या एका निकटवर्तीयाकडून जप्त करण्यात आलेल्या डायरीमध्ये 65 कोटी रुपये देण्यात आले असल्याचा उल्लेख आहे, असे स्पष्ट करत येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोपांची झोड उठविली. सिद्धरामय्या यांनी कॉंग्रेसच्या पक्ष श्रेष्टींना एक हजार कोटी रुपये दिले असल्याचा आरोपही येडियुरप्पा यांनी केला आहे.

Web Title: yediyurappa slams siddharamaiah