विधिमंडळात आम्ही बहुमत सिद्ध करू - येडीयुरप्पा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 मे 2018

बंगळुरू : आमच्याजवळ बहुमत आहे आम्ही उद्या ते सभागृहात सिद्ध करू असा ठाम विश्‍वास कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी व्यक्त केला.

कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडीयुरप्पा यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यांच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात कॉंग्रेसने आव्हान दिले होते. या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने उद्या सभागृहात आपले बहुमत सिद्ध करा असा आदेश येडीयुरप्पा यांना दिला. न्यायालयाच्या निर्णयानंतर आपल्या सरकारच्या स्थिरतेचा दावा करून आम्ही विश्‍वासमत प्रस्ताव मंजूर करू असे त्यांनी सांगितले. 

राज्यपालांच्या या निर्णयानंतर कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. कॉंग्रेसच्या या निर्णयावर न्यायालयात मध्यरात्रीनंतर सुनावणी झाली होती. त्यात आज शुक्रवारी सकाळी पुन्हा सुनावणी घेण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकच्या राज्यपालांनी दिलेली 15 दिवसांची मुदत कमी करून उद्याच विश्‍वासमत प्रस्ताव मांडायला सांगितला आहे. 

Web Title: yediyurrapa-confidand-about-government