

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाविरोधात आणि केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे २ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या आंदोलनाला मोठे वळण मिळाले आहे. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व कार्यकर्ते योगेंद्र यादव यांना पुन्हा ताब्यात घेतले आहे.