'मोदींमुळे लोकसभेत भाजपला 100 जागांवर फटका बसणार'

वृत्तसंस्था
रविवार, 23 डिसेंबर 2018

भाजपसह मोदींच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस घट होत असल्याचं विधान स्वराज इंडियाचे संस्थापक अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी केले आहे. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे विधान केलं आहे. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला याचा फटका बसून त्यांच्या खासदारांची संख्या 100 ने कमी होईल, असेही ते म्हणाले.

नवी दिल्ली- भाजपसह मोदींच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस घट होत असल्याचं विधान स्वराज इंडियाचे संस्थापक अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी केले आहे. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे विधान केलं आहे. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला याचा फटका बसून त्यांच्या खासदारांची संख्या 100 ने कमी होईल, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेस अजूनही झोपेत आहे, तसेच काँग्रेस एक अयोग्य पक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यादव यांनी स्वतःच्या पक्षाकडून जनआंदोलन सुरू केलं आहे. तसेच चांगलं काम करणाऱ्या लोकांना त्यांनी समर्थन दिलं आहे.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रदर्शनाचा हवाला देत त्यांना काँग्रेस राजकारणात अयोग्य पार्टी असल्याचंही म्हटलं आहे. काँग्रेसला कोणत्याही संधीचा योग्य फायदा उचलता येत नाही. काँग्रेस अजूनही झोपेतच आहे. त्यांची झोप अद्यापही उडालेली नाही. हा निष्काळजीपणा आहे. जर ते या तीन राज्यांतील विजयानंतर 2019चं लोकसभा जिंकण्याचं स्वप्न पाहत असतील, तर ते मूर्खच आहेत, असे म्हणावे लागेल, असेही यादव यावेळी म्हणाले. भाजप देशासाठी घातक असली तरी ती सक्रिय आहे. भाजपा देशाला विनाशकारी मार्गावर घेऊन जात असल्याची टीकाही यादव यांनी केली.

Web Title: yogendra yadav says pm modi and bjp fall in popularity