जवानांशी गैरवर्तन करणाऱ्यांना गोळ्या घाला- योगेश्वर दत्त

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

CRPF च्या एका जवानाला श्रीनगरमध्ये काही युवकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सोनिपत : जो कोणी आपल्या देशाविरोधात कृती करेल आणि आपल्या सैनिकांशी गैरवर्तन करेल त्याला गोळ्या घालून मारले पाहिजे, अशी तीव्र प्रतिक्रिया ऑलिंपिक पदकविजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने व्यक्त केली आहे. 

CRPF या भारतीय निमलष्करी दलातील एका जवानाला श्रीनगरमध्ये काही युवकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय फलंदाज गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनीही या प्रकाराबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. 

योगेश्वर दत्त म्हणाला, "जे घडले ते अत्यंत चुकीचे आहे. आमच्या CRPF जवानाचा अपमान करण्यात आला. त्यांच्या क्रूरपणे हल्ला करून त्यांचे हेल्मेटसुद्धा रस्त्यावर टाकून देण्यात आले. हे पाहणे अतिशय अपमानकारक व दुःखद आहे."

एका थपडेबद्दल 100 जिहादींना ठार मारा, अशा शब्दांत गौतम गंभीरने आपला राग व्यक्त केला. तसेच, 'CRPFच्या जवानांबाबत कोणी असे करू शकत नाही. हे थांबले पाहिजे. यह बद्तमिझी की हद्द है।' असे क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने सुद्धा ट्विटरवरून म्हटले आहे.

दरम्यान, एका काश्मिरी युवकाला लष्कराच्या जीपच्या पुढे बांधल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला होता. काश्मीरमध्ये जवानांवर स्थानिक युवक मोठ्या प्रमाणात दगडफेक करतात.  लष्कराच्या वाहनावर स्थानिक दगडफेक करत असल्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी जवानांनी एका युवकाला जीपच्या पुढे बांधल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Yogeshwar Dutt says Anyone Misbehaving With Our Soldiers Should Be 'Shot Dead'