अबू सालेमचे योगी आदित्यनाथांना पत्र

पीटीआय
बुधवार, 14 मार्च 2018

लखनौ : मुंबईतील 1993 च्या बाँबस्फोटातील आरोपी अबू सालेमने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. आझमगढ जिल्ह्यातील पूर्वजांच्या जमिनींना उत्तर प्रदेश सरकारने संरक्षण द्यावे, असे सालेमने आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

लखनौ : मुंबईतील 1993 च्या बाँबस्फोटातील आरोपी अबू सालेमने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. आझमगढ जिल्ह्यातील पूर्वजांच्या जमिनींना उत्तर प्रदेश सरकारने संरक्षण द्यावे, असे सालेमने आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

मुंबई येथील केंद्रीय कारागृहात सालेम जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सालेमचा वकील राजेश सिंग याने याबाबत माहिती दिली. सालेमची आझमगढ जिल्ह्यात पूर्वजांची जमीन आहे. या जमिनीवर अतिक्रमण होत असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानुसार सालेमने वकीलाकरवी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पूर्वजांच्या जमिनींना संरक्षण देण्याची मागणी केली. 

याबाबत 'कथुआनी' (अधिकृत भूमी अभिलेख) आझमगढचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांना सादर करण्यात आली आहे. काही लोक बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने या जमिनीवर ताबा मिळवून अवैध बांधकाम करू पाहात आहेत. सरकारने त्यांना प्रतिबंध करावा. सालेम यांच्या जागी अवैध बांधकाम झाले असल्यास ते पोलिसांनी पाडावे, अशी मागणी पत्रामध्ये केली आहे. 30 मार्च 2013 च्या नोंदीनुसार सालेम व त्याच्या भावाची जमिनींच्या नोंदीवर नावे आहेत. मात्र डिसेंबर 2017 मध्ये नोंदीवरील नावे बदलल्याचे सालेमच्या वकिलांनी सांगितले. 

आझमगढ ते अंडरवर्ल्ड 
सालेमचा जन्म 1967 मध्ये आझमगढ जिल्ह्यात झाला. लहानपणी उदरनिर्वाहासाठी तो रिक्षा चालवित असे. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी सालेमवर आली. काही दिवसांनंतर तो दिल्लीला टॅक्‍सीचालकाचे काम करू लागला.

कालांतराने दिल्ली सोडून मुंबईला रवाना झालेल्या सालेमची दाऊदशी भेट झाली. पुढे तो अंडरवर्ल्डमध्ये सामील झाला. 1993च्या मुंबई बॉंबस्फोटासाठी सालेमला जन्मठेपेची शिक्षा मिळाली. 

Web Title: Yogi Adityanath abu salem 1993 Mumbai Blasts