

UP
esakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी बिजनौर (Bijnor) दौऱ्यावर असताना एका भव्य कार्यक्रमात पाकिस्तानमधून विस्थापित झालेल्या (Displaced Families) १,६४५ पीडित कुटुंबांना, माजी सैनिकांना आणि भाडेपट्टेदारांना जमिनीच्या मालकी हक्काच्या प्रमाणपत्रांचे (Land Ownership Certificates) वाटप केले. यामुळे गेल्या अनेक दशकांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे ८ ते १० हजार लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.