बुलडोझर बाबांमुळे ‘यूपी’चुकीच्या दिशेने; अखिलेश यादव

योगी आदित्यनाथ यांचा बुलडोझर बाबा असा उल्लेख करीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी टीकेची झोड उठविली
Yogi Adityanath Bulldozer Baba leads UP wrong direction socialist Party chief Akhilesh Yadav slammed
Yogi Adityanath Bulldozer Baba leads UP wrong direction socialist Party chief Akhilesh Yadav slammedAkhilesh Yadav

लखनौ : योगी आदित्यनाथ यांचा बुलडोझर बाबा असा उल्लेख करीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी टीकेची झोड उठविली. हे बुलडोझर बाबा उत्तर प्रदेशला चुकीच्या दिशेने नेत आहेत. राज्य अनागोंदी आणि जंगलराजच्या दिशेने नेले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अखिलेश म्हणाले की, गेली पाच वर्षे राज्यातील स्थिती अशीच आहे. योगींचा हात बुलडोझरच्या स्टिअरींगवर आहे. ते विरोधकांचा पाठलाग करीत आहेत, तर दुसरीकडे सत्तेचे अभय मिळालेले गुन्हेगार धुमाकूळ घालत आहेत.

भाजप खोटे बोलण्यात पटाईत आहे. खोटारडेपणा आणि फसवणुकीच्या जोरावर विधानसभा निवडणूक जिंकण्यात आली. विधिमंडळ निवडणुकीतही विजयासाठी बिगरलोकशाही मार्गांचा अवलंब करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा दावा अखिलेश यांनी केला. अशावेळी राज्यात कोण गुंतवणूक करेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महागाईवरून केंद्रातील सत्ताधारी भाजपवर अखिलेश यांनी टीका केली. ते म्हणाले की, अनेक वस्तूंच्या किमती वाढत असल्यामुळे सारा देश त्रस्त झाला आहे, पण केंद्राची महागाईवर नियंत्रण मिळविण्याची कोणतीही इच्छा नाही. या सरकारने व्याजदरही कमी केले आहेत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेने गुडघे टेकले आहेत. अनेक बँका बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

अयोध्येतील मठात बलात्काराचा दावा

अखिलेश म्हणाले की, भाजप सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर येताच अयोध्येत पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. या धक्क्यामुळे मुलीचे काका मरण पावले. तिचे कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. बलात्कार जेथे झाला त्या मठावर योगींनी बुलडोझर का चालविला नाही...मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाजवळील जिल्ह्यात एका मुलाचे अपहरण करण्यात आले. पालकांनी खंडणी दिली नाही म्हणून त्याचा खून करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com