योगी सरकार सुरु करणार 'अन्नपूर्णा भोजनालय'

वृत्तसंस्था
शनिवार, 8 एप्रिल 2017

या योजनेंतर्गत सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण मिळणार आहे. नाश्ता 3 रुपयांना तर जेवण 5 रुपयांना असणार आहे. उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही भोजनालये सुरु करण्यात येणार आहेत. 

लखनौ - तमिळनाडूतील 'अम्मा कँटिन'प्रमाणे उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 'अन्नपूर्णा भोजनालय' सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

अन्नपूर्णा भोजनालयात पाच रुपयांमध्ये जेवण मिळणार आहे. या भोजनालयाचा मसूदा तयार करण्यात आला असून, मुख्य सचिवांनी हा मसूदा पाहिला आहे. या योजनेची पूर्ण माहिती योगी आदित्यनाथ 12 एप्रिलला घेणार आहेत.

या योजनेंतर्गत सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण मिळणार आहे. नाश्ता 3 रुपयांना तर जेवण 5 रुपयांना असणार आहे. उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही भोजनालये सुरु करण्यात येणार आहेत. 

मध्य प्रदेशातही मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिनदयाळ उपाध्याय अंत्योदन रसोई योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गतही पाच रुपयांमध्ये जेवण मिळणार आहे.

Web Title: yogi adityanath govt launch annapurna bhojnalaya thali in rs 5