'यूपी'मध्ये सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची 

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

प्रधानमंत्री आवास योजना, "मनरेगा', राष्ट्रीय पेयजल योजना, राज्य ग्रामीण पेयजल योजना आदी योजनांची प्रभावी आणि तातडीने अंमलबजावणी करावी अशा सूचना अदित्यनाथ यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे सांगण्यात आले. 

लखनौ - उत्तर प्रदेशातील सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी घेतला आहे. अगदी ब्लॉक पातळीपर्यंतच्या कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा बसविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

अदित्यनाथ यांनी शनिवारी रात्री उत्तर प्रदेश सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या वेळी राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा बसविण्याचे आदेश त्यांनी दिले. "राज्यात ब्लॉक पातळीपर्यंतच्या कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा बसविण्यात यावी. तसेच ग्रामपंचायतींमध्ये एका फलकावर सरपंचाचा संपर्क क्रमांक आणि सुरू असलेल्या कामांची माहिती देणे बंधनकारक करावे,'' असे अदित्यनाथ यांनी बैठकीवेळी सांगितले.

केंद्र सरकारकडून राबिण्यात येणारा सर्व योजनांची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. समग्र ग्रामविकास विभागाचे ग्रामविकास विभागात विलीनीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

प्रधानमंत्री आवास योजना, "मनरेगा', राष्ट्रीय पेयजल योजना, राज्य ग्रामीण पेयजल योजना आदी योजनांची प्रभावी आणि तातडीने अंमलबजावणी करावी अशा सूचना अदित्यनाथ यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: Yogi Adityanath orders biometric attendance machines at block level