Yogi Government : अतिकनं ताब्यात घेतलेली घरं, जमिनी पीडितांना परत करणार; CM योगींचा मोठा निर्णय

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या निर्णयाचं पीडित सूरज कली यांनी स्वागत केलंय.
Yogi Adityanath
Yogi Adityanathesakal
Summary

गेल्या 35 वर्षांपासून माफिया अतिक अहमदकडून आपली जमीन परत मिळवण्यासाठी लढा देत असलेल्या सूरज कली यांना सीएम योगींच्या निर्णयामुळं त्यांची मालमत्ता परत मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

प्रयागराज : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी माफिया अतिक अहमदनं ताब्यात घेतलेल्या जमिनी आणि घरं पीडितांना परत करण्यासाठी आयोग स्थापन करण्याबाबत बोललं आहे.

आयोग स्थापन करून पीडितांची मालमत्ता त्यांना कायदेशीर मार्गानं परत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. सीएम योगींच्या या निर्णयाचं प्रयागराजच्या झाल्वा येथील रहिवासी जयश्री उर्फ ​​सूरज कली यांनी स्वागत केलंय.

Yogi Adityanath
Muslim Reservation : मुस्लिमांचं चार टक्के आरक्षण का रद्द केलं? अमित शहांनी सांगितलं 'कारण'

गेल्या 35 वर्षांपासून त्या माफिया अतिक अहमदविरोधात लढत आहेत. त्या म्हणाल्या, 'माझ्याकडं वडिलोपार्जित साडे बारा एकर जमीन होती. ती जमीन माफिया अतिकनं ताब्यात घेतली. एवढंच नाही तर 1989 मध्ये माझे पती ब्रिजमोहन उर्फ ​​बच्चा कुशवाह देखील गायब झाले होते. त्यांचा आजपर्यंत कोणीही शोध लावला नाही.'

Yogi Adityanath
Weather Update : उकाड्यापासून मिळणार दिलासा! 'या' 16 राज्यांत कोसळणार दमदार पाऊस

मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या निर्णयाचं पीडित सूरज कली यांनी स्वागत केलंय. मुख्यमंत्री योगी हे संपूर्ण राज्यासाठी वडिलांसारखे असून त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलं. गेल्या 35 वर्षांपासून माफिया अतिक अहमदकडून आपली जमीन परत मिळवण्यासाठी लढा देत असलेल्या सूरज कली यांना सीएम योगींच्या निर्णयामुळं त्यांची मालमत्ता परत मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com