तुम्ही गांधीजींच्या बाजूने की गोडसेच्या?

पीटीआय
Wednesday, 19 February 2020

विकासाच्या मॉडेलवर आक्षेप का नाही?
अनेक बाबतींमध्ये बिहार आजदेखील पिछाडीवर आहे. बिहारची गणना २००५ पासून गरीब राज्यांमध्ये होते. आजदेखील फारशी सुधारणा झालेली नाही. हे असे असतानाही कुणीही नितीश यांच्या विकासाच्या मॉडेलला आक्षेप घेतलेला नाही, अशी खंत प्रशांतकिशोर यांनी व्यक्त केली.

‘पी. के.’ म्हणाले...

  • नितीश यांच्यासोबतचे मतभेद वैचारिक
  • इतर पक्षांचा एजंट म्हणून काम केले नाही
  • फायद्यासाठी नितीश यांनी खुशाल खोटे बोलावे
  • बिहारला कुणाच्या मागे धावणारा नेता नको
  • विशेष दर्जाबाबत नितीश केंद्रासमोर हतबल
  • नितीश यांनी रस्ते बांधले; पण गरिबी संपली नाही
  • बिहारमधील शिक्षणाचा दर्जा सुधारला नाही

पाटणा - रणनीतिकार प्रशांतकिशोर यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर पत्रकार परिषदेत थेट निशाणा साधला. ‘तुम्ही गांधीजींच्या बाजूने उभे आहात की गोडसेच्या,’ असा सवाल करत त्यांनी बिहारच्या विकासाच्या मॉडेलवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. दहा आघाडीच्या राज्यांमध्ये बिहारला स्थान मिळावे म्हणून त्यांनी ‘बात बिहार की’ या मोहिमेचीही घोषणा केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बिहारमध्ये नवा राजकीय पर्याय तयार व्हावा, असे ज्या लोकांना वाटते त्यांच्या भेटीगाठी घेण्याचा निर्धार बोलून दाखवीत प्रशांतकिशोर यांनी २० फेब्रुवारीपासून थेट जनतेच्या दारी जाण्याची घोषणा केली. नितीश यांच्यासोबतच्या संबंधांवर भाष्य करताना ते म्हणाले, ‘‘नितीशजी यांनी मला मुलाप्रमाणे वागणूक दिली. माझ्या मनात त्यांच्याविषयी आदराचीच भावना आहे. मला पक्षात ठेवाचे की नाही, याचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार त्यांच्याकडे आहेत.

रेल्वे स्थानकांवरील वाय-फाय सेवा होणार बंद! 

नितीश यांच्यासोबतचा वाद केवळ महिनाभरापूर्वीचा नाही, तो खूप आधीपासून सुरू झाला होता. हा संघर्ष गांधी की गोडसे, अशा स्वरूपाचा आहे. माझ्यासाठी गांधी आणि गोडसे कधीच एक असू शकत नाहीत. काळानुसार नितीशकुमार यांचे भाजपसोबतचे संबंध बदलत गेले. बिहारला आज ठोस भूमिका घेणाऱ्या नेत्याची आवश्‍यकता आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: You are in favor of Gandhiji or Godse