'आप' म्हणजे 'अलिबाबा आणि 40 चोर': कॉंग्रेस

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील राजधानी दिल्लीत सत्तेवर असलेला आम आदमी पक्ष म्हणजे ‘अलिबाबा आणि 40 चाळीस चोर‘ असल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे.

नवी दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील राजधानी दिल्लीत सत्तेवर असलेला आम आदमी पक्ष म्हणजे ‘अलिबाबा आणि 40 चाळीस चोर‘ असल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे.

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमधील निलंबित महिला व बालविकासमंत्री संदीप कुमार यांची एक अश्‍लील सीडी समोर आली आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केल्याची माहिती केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे दिली. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस नेत्या शोभा ओझा वृत्तसंस्थेशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘आम आदमी पक्ष एका बाजूला स्वच्छ व्यक्तिंसह नव्या राजकीय पद्धतीविषयी बोलतो. मात्र पक्षातील आमदार आणि मंत्र्यांना चुकीच्या कृत्यांबद्दल पक्षातून हटविण्यात येत आहे. त्यामुळे आम आदमी पक्ष हा अशाच आमदारांचा, मंत्र्यांचा समूह असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पक्ष पुन्हा एकदा स्पष्टपणे उघड पडला आहे.‘ तसेच आम आदमी पक्ष म्हणजे ‘अलि बाबा आणि 40 चोर‘ असल्याची टीकाही ओझा यांनी केली आहे.

कुमार यांच्या अश्‍लील सीडीमध्ये काही छायाचित्रे आणि नऊ मिनिटांच्या व्हिडिओचा समावेश आहे. व्हिडिओत कुमार दोन महिलांसमवेत असल्याचे दिसत असून, ते महिलांना "दिवसा भेटत जाऊ नका, रात्री नऊनंतर येत जा‘, असे म्हणत आहेत.

Web Title: 'You' means 'alibaba and 40 Thieves': Congress