
एका तरुणाने एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या मुलींशी लग्न केले. सकाळी त्याने त्याच्या प्रेयसीसोबत कोर्ट मॅरेज केले आणि रात्री त्याने त्याच्या कुटुंबाच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले पण जेव्हा प्रेयसीला आपला विश्वासघात झाला आहे हे कळले तेव्हा ती त्याच्या घरी पोहोचली, परंतु त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला हाकलून लावले. यानंतर तिने न्यायासाठी पोलिसांकडे दाद मागितली. उत्तप्रदेशातील गोरखपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आले आहे.