नितीशकुमार यांच्यावर तरुणाने फेकली चप्पल

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

पटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर एका तरुणाने चप्पल फेकली. त्यानंतर त्या तरुणाने आरक्षणाचा विरोध करत घोषणाबाजी केली. याप्रकारानंतर संयुक्त जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी तरुणाला मारहाण केली. त्यानंतर संबंधित तरुणाला पोलिसांच्या हवाली केले.

नितीशकुमार संयुक्त जनता दलाच्या एका कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी व्यासपीठावर गेल्यानंतर एका तरुणाने त्यांच्यावर चप्पल फेकली. या चप्पलफेकीनंतर संबंधित तरूणाने जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेनंतर जदयूच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला मारहाण केली. पोलिसांनी तातडीने संबंधित तरुणास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता चंदन असे त्याचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. 

Web Title: A Young Man Threw Slipper On Bihar Chief Minister Nitish Kumar In Patna