
गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण शिकार खात असलेल्या सिंहाजवळ जाऊन त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न करतो. ही घटना तलाजा तालुक्यातील बांभोर गावाजवळील जंगल परिसरात घडल्याचे सांगितले जात आहे. सिंह हा अत्यंत भयानक आणि हिंस्र प्राणी मानला जातो. विशेषतः तो शिकार करताना किंवा शिकार खात असताना त्याच्या आसपास कोणतीही हालचाल त्याला सहन होत नाही. अशा वेळी त्याच्या जवळ जाणे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखं असतं. तरुणाच्या व्हायरल व्हिडीओनंत खळबळ उडाली आहे.