उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील गोरखनाथ पोलीस स्टेशन परिसरात एका मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. एका तरुणाने भूल मिसळून तिला चिकन रोल खाऊ घातल्याचा आरोप तरुणीने केला आहे. ती बेशुद्ध झाल्यावर त्याने तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर आरोपीने तिचा अश्लिल व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करत राहिले. आता तरुणीने पोलिसात तक्रार केली आहे.