युवती म्हणाली, मी कोरोना पॉझिटिव्ह आणि तो पसरवणार...

girl claiming to have coronavirus and spreading through video on social media
girl claiming to have coronavirus and spreading through video on social media

टेक्सास (अमेरिका) : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना अनेकांना जीव गमवावा लागत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेकजण अहोरात्र प्रयत्न करत असताना एका युवतीने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. संबंधित युवतीचा पोलिस शोध घेत आहेत.

युवतीने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'मी कोरोना पॉझिटिव्ह, आणि आता मी कोरोना पसरवणार.' युवतीने तो व्हिडिओ जाणीवपूर्वक सोशल मीडियावर अपलोड केला आहे. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर तो अमेरिकेच्या टेक्सासमधील कॅरोल्टन शहरात राहणाऱ्या तरुणीचा असल्याची माहिती पुढे आली.

युवतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी ट्वीट करून या प्रकरणाची माहिती दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, संबंधित मुलीची ओळख पटली असून, तिचे नाव लॉरेन मराडियागा आहे. परंतु, तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. लॉरेनवर दहशत पसरविण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय, लॉरेनकडून सामान्य नागरिकांना खरोखर धोका आहे की नाही, हे पाहिले जाणार आहे. तिची कोरोना चाचणीही करण्यात येणार आहे.'

लॉरेनने सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांची फिरकी घेतली असेल तर तिला महागात पडू शकते. दरम्यान, कोरोनाने महासत्ता असलेल्या अमेरिकेचे कंबरडे मोडले आहे. अमेरिकेत 3 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय, कोरोनामुळे जवळजवळ 10 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com