'जय श्री राम'चा नारा दिल्याने राॅडने मारहाण; वाचा, बंगळुरूमध्ये राम नवमीला काय घडले?

बंगळुरुमध्ये रामनवमी दिवशी दोन गटांमध्ये हानामारी झाली. काही लोक 'जय श्री राम'च्या घोषणा करत असताना दोन जनांनी त्यांच्यावर राॅडने हल्ला केला आहे. या घटनेत 2 लोक गंभीर जखमी झाले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
sameer and farman
sameer and farmansakal

बंगळुरुमध्ये रामनवमी दिवशी दोन गटांमध्ये हानामारी झाली. काही लोक 'जय श्री राम'च्या घोषणा करत असताना दोन जनांनी त्यांच्यावर राॅडने हल्ला केला आहे. या घटनेत 2 लोक गंभीर जखमी झाले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, चिक्काबेट्टाहल्ली येथे घटलेल्या या घटनेत दोन लोकांना अटक करण्यात आले आहे. तसेच आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

दोन्ही आरोपी हे एमएस पाल्या येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत बंगळुरुच्या उत्तर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत असलेल्या केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी बुधवारी रात्री पीडितांची भेट घेतली आणि नेमक काय घडलं? हे जाणून घेतलं.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना घडली तेव्हा संजीवनगर येथील पवन कुमार, राहुल आणि विनायक कारमधून दुचाकी खरेदी करण्यासाठी एमएस पाल्याकडे जात होते. त्यांच्याकडे भगवा झेंडा होता आणि ते जय श्री रामच्या घोषणा देत होते.

sameer and farman
Ram Navami 2024 : टीम लीडर व्हायचंय? रामायणातील या पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा

ते जय श्री रामचा नारा देत असाताना दुचाकीवरुन येत असलेल्या फरमान आणि समीरने त्यांना थांबवले आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुम्ही 'जय श्री राम'च्या घोषणा का देत आहात? त्यांना अल्ला हू अकबरचा नारा देण्याच म्हणण्याचा आग्रह केला. फरमानने झेंडा ओढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फरमान आणि समिरचा पाठलाग केला परंतु समीर पळून गेला.

पोलिस अधिकारी म्हणाले की, आम्ही तेथे पोहोचल्यानंतर पीडितांना उपचारासाठी दवाखाण्यात केले. राहुलच्या डोक्यात राॅडने वार करण्यात आला आहे. तर विनायकच्या नाकाच्या हाडावर जखम झाली आहे. पवनकडून मिळालेल्या माहितीनूसार विद्याणपुरा पोलिसांनी आरोपींच्या विरोधात धार्मिक भावना दुखावण्यासह विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल केला आहे.

sameer and farman
Ram Navami 2024 : जय श्रीरामांच्या गजरात श्रीराम जन्मोत्सव! भाविकांची गर्दी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com