Congress Chintan Shibir
Congress Chintan Shibir

काँग्रेस होणार तरुण; चिंतन शिबिरात नेत्यांच्या निवृत्तीचं वय निश्चित

युथ काँग्रेसनं केली होती सूचन

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये नेत्यांचं निवृत्तीचं वय निश्चित करण्यात यावं आणि निवृत्तीचं वय ६५ वर्षे असावं, अशी सूचना युथ काँग्रेसनं केली आहे. राजस्थनातील उदयपूर इथं सुरु असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात ही सूचना करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे या सूचनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. पण २०२४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येईल, असं सुत्रांच्या हवाल्यानं एएनआयनं म्हटलं आहे.

Congress Chintan Shibir
महापालिका निवडणुका टप्प्याटप्प्यानं होणार; सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे निर्देश

उदयपूरमध्ये तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा चिंतन शिबिर होत आहे. या शिबिराला ४३० काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावली आहे. यावेळी काँग्रेसनं पक्षाचा सहा कलमी कार्यक्रम तयार केला असून तो हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राजकारण, संघटना, शेतकरी-कृषी, युवांचे प्रश्न, सामाजिक न्याय आणि कल्याण-आर्थिक असे विविध विषय हाताळण्यासाठी सहा कमिटी तयार करण्यात आल्या आहेत. या कमिट्यांनी आपला कार्यक्रम सोनिया गांधींकडे सोपवला आहे.

Congress Chintan Shibir
"मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला ठाम विश्वास

चिंतन शिबिरामध्ये कॉंग्रेसच्या वर्किंग कमिटीनं ठराव पास केला यामध्ये तरुण नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी ५० वर्षांखालील नेत्यांसाठी आरक्षणाची घोषणा करण्यात आली होती. त्याचबरोबर वरिष्ठ लोकांसाठी २०२४ पर्यंत निवृत्तीचा कालावधी वाढवून दिला आहे.

२०२४ नंतर काँग्रेसमधून कोण होईल निवृत्त?

काँग्रेसमध्ये सध्या भुपिंदरसिंग हुडा, कमलनाथ, दिग्विजय सिंह, प्रतिभा विरभद्र सिंह या नेत्यांचं वय ६५ वर्षांपेक्षा अधिक आहे. त्याशिवाय अशोक गेहलोत, पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मल्लिकार्जुन खर्गे आणि पवन बन्सल यांचं देखील वय ६५ वर्षांपेक्षा अधिक आहे. इतकेचं नव्हे तर सोनिया गांधी देखील या वयाच्या मर्यादेत बसतात.

५० टक्के जागा तरुण नेत्यांसाठी राखीव

त्याचबरोबर या बैठकीत हे देखील निश्चित करण्यात आलं की, संघटनेतील ५० टक्के उपलब्ध पदं तरुण नेत्यांना म्हणजेच ५० वर्षांखालील नेत्यांना देण्यात यावेत, याला सर्व वरिष्ठ नेत्यांनी सहमती दर्शवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com