
उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील सदर कोतवाली भागात एका तरुणाने प्रेमात विश्वासघात झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत तरुणाचे नाव रौनक पांडे असे आहे. मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी मुलीवर त्यांच्या मुलाला फसवल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.