जीव गेला, पाणी प्यायला अन् परत गेला...

वृत्तसंस्था
सोमवार, 15 जुलै 2019

एका युवकाला डॉक्टरांनी मृत्युमुखी घोषित केले. मृतदेहावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना युवकाने हालचाल करत पाण्याची मागणी केली.

लखनौः एका युवकाला डॉक्टरांनी मृत्युमुखी घोषित केले. मृतदेहावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना युवकाने हालचाल करत पाण्याची मागणी केली. एक कपभर पाणी पण प्यायला. नातेवाईकांनी पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पण पुन्हा डॉक्टरांनी मृत्युमुखी म्हणून घोषित केले.

उत्तर प्रदेशच्या राजधानीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अमिनाबाद येथील रहिवासी गुरु प्रसाद यांचा मुलगा संजय (वय 28) याची प्रकृती काही दिवसांपूर्वी खालावली होती. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला म्हणून नातेवाईकांना सांगितले. नातेवाईकांनी त्याचा मृतदेह घरी आणला.

संजयच्या अंत्यसंस्काराची सकाळी 10 वाजता तयारी सुरू झाली. मात्र, त्यावेळी त्याच्या शरीराची हालचाल झाली. शिवाय, त्याने डोळेही उघडले. पाण्यासाठी त्याने इशारा केला आणि एक कप पाणी प्यायला. यानंतर त्याच्या कुटुंबियांनी बलरामपूरमधील रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, संजयचा मृत्यू व त्यानंतर त्याने डोळे उघडून एक कपभर प्यायलेले पाणी व पुन्हा मृत्यू, याबाबतची चर्चा राज्यात सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth gets up after he was declared dead by doctor at lucknow

टॅग्स