राहुल गांधी बोलू लागल्याचा आनंद - मोदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

वाराणसी -  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी भाषण द्यायला शिकत आहेत. आता ते बोलू लागले आहेत, याचा मला आनंद आहे. अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

वाराणसी येथे पंडीत मदनमोहन मालवीय कर्करोग केंद्राच्या उद्धाटनप्रसंगी मोदींनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी यांनी गुजरातमधील जाहीर सभेत राजकीय भूकंप घडवून आणत थेट पंतप्रधान मोदींवर सहारा कंपनीकडून पैसे स्वीकारल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. "सहारा' कंपनीने मोदींना कोट्यवधी रुपये दिले. सहा महिन्यांमध्ये नऊ वेळेस हे पैसे देण्यात आले, असे आरोप केले होते. याविषयी मोदींनी वक्तव्य केले.

मोदी म्हणाले, ''राहुल गांधी बोलायला लागल्यापासून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांच्या भाषणाने मोठा भूकंप झाला. काही जणांचे काळे मन बोलू लागले आहे. गरिबी ही माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे देणं आहे. ते स्वतःच्या कामाचे रिपोर्टकार्ड देत होते की मी केलेल्या कामाचे. देशात ६०% लोकं अशिक्षित आहे, हे कोणाचं प्रगतीपुस्तक आहे.''
 
सध्या देशात सर्वात मोटी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. देशातील नागरिक नाटाबंदीच्या निर्णयाच्या पाठिशी आहे. काही लोकांचा काळा पैसा उघड होत आहे. नोटाबंदीच्या निर्णयाने जनतेला खूप त्रास सहन करावा लागला आहे. पण, तरीही लोक देशाच्या भल्यासाठी काम करत आहेत, असे मोदींनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth leader learnt how to make speeches: PM Modi mocks Rahul Gandhi