Agneepath : दोन वर्षांपासून सैन्य भरतीसाठी झटणाऱ्या तरूणाची आत्महत्या

youth preparing for army recruitment for two years committed suicide by hanging in rohtak
youth preparing for army recruitment for two years committed suicide by hanging in rohtak

रोहतक : एकीकडे देशात केंद्राने जाहीर केलेल्या अग्निपथ (Agneepath Recruitment) योजनेला विरोध करण्यात येत असताना, दोन वर्षांपासून कठोर मेहनत घेत लष्करात भरती होण्यासाठी तयारी करणाऱ्या तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरियाणाच्या रोहतकमध्ये ही दुर्देवी घटना घडली असून हा तरूण जींदच्या रहिवासी असल्याचे समोर आले आहे. (youth preparing for army recruitment for two years committed suicide by hanging in rohtak)

हरियाणाच्या रोहतकमधील एका पीजी हॉस्टेलमध्ये सचिन नावाच्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सचिन हा जींद जिल्ह्यातील लिजवाना येथील रहिवासी आहे. सचिन गेल्या दोन वर्षांपासून सैन्य भरतीची तयारी करत होता. त्याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसले तरी त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सैन्यात भरती व्हायचे होते, यासाठी तो खूप मेहनत घेत होता, अशी माहिती दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी हॉस्टेलमधील त्याच्या सहकाऱ्यांची चौकशी सुरु केली असून सकाळी पीजीच्या तरुणांनी त्याचा मृतदेह दोरीला लटकलेला आढळून आला त्यानंतर त्यांनी हॉस्टेल संचालकाला याबाबत माहिती दिली त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. त्याच्यासोबत त्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणाने दिलेल्या माहितीनुसार लष्करात भरतीसाठी तो दोनदा पात्र झाला होता. मात्र, भरती झाली नाही. यामुळे तो त्रस्त होता.

youth preparing for army recruitment for two years committed suicide by hanging in rohtak
केतकी चितळेला ठाणे कोर्टाकडून जामीन, तरीही राहणारा जेलमध्ये

सध्या केंद्र सरकारच्या अग्निपथ या सैन्यात ४ वर्षांसाठी भरतीच्या योजनेवरून देशातील पाच राज्यांत मोठा गोंधळ उडाला आहे. संतप्त झालेल्या तरुणांनी विविध ठिकाणी आंदोलन केले. तर काही ठिकाणी आंदोलकांनी ट्रेनचे डबेदेखील पेटवून दिल्याचा प्रकार घडला. तसेच दगडफेक आणि हिंसाचारही सुरु झाला आहे. चार वर्षांनी पुढे काय, असा प्रश्न हे तरुण विचारत आहेत.

youth preparing for army recruitment for two years committed suicide by hanging in rohtak
युपीत बुलडोझर कायद्यानुसार चालला का? योगी सरकारला SC ची नोटीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com