मुलाने केला बलात्कार अन् बापाने केली हत्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : एका 21 वर्षीय युवकाने सात वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला. बलात्कार करणाऱया मुलाच्या बापाने मुलाला वाचविण्यासाठी पीडित चिमुकलीची हत्या केल्याची घटना येथील निहाल विहारमध्ये घडली आहे. या घटनेमुळे राजधानीत खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली : एका 21 वर्षीय युवकाने सात वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला. बलात्कार करणाऱया मुलाच्या बापाने मुलाला वाचविण्यासाठी पीडित चिमुकलीची हत्या केल्याची घटना येथील निहाल विहारमध्ये घडली आहे. या घटनेमुळे राजधानीत खळबळ उडाली आहे.

पीडित चिमुकली बहिणीसोबत चायनीज पदार्थ आणण्यासाठी गेली होती. यावेळी नशेच्या आहारी असलेल्या राजेंद्रने चिमुकलीचे अपहरण केले अन् बलात्कार केला. घटना घडल्यानंतर चालक असलेला मुलाचा बाप रामशरण 45 मिनिटांनी घरी आला. त्याला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याने चिमुकलीचा गळा दाबून खून केला. शिवाय, ओळख पटू नये म्हणून तिचा मृतदेह दगडाने अक्षरशः ठेचला. दुसऱया दिवशी मृतदेह अतिशय विचित्र अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली. या घटनेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 200 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फूटेजेस तपासली. एका फूटेजमध्ये दोघेजण स्कूटरवरुन एक बॅग नेताना दिसून आले. चौकशी केल्यानंतर या बॅगेत मृतदेह असल्याचे समोर आले. चौकशीदरम्यान मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील निहाल विहारमध्ये आरोपी राजेंद्रने सात वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केला. मुलाला वाचवण्यासाठी त्याचा 51 वर्षीय बाप रामशरणने पीडितेची गळा दाबून हत्या केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, मुलाला मदत केल्याप्रकरणी रामशरण व राजेंद्रला अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, राजेंद्र याने यापूर्वीही परिसरातील 16 वर्षीय युवतीवर बलात्कार केला होता. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. जामिनावर त्याची सुटका झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth rape accused sexually assaulted and murdered minor in new Delhi