YS Jagan Mohan Reddy: फ्लेक्स फाडण्यावरुन आंध्र प्रदेशात तणाव

जगनमोहन रेड्डी यांचे भले मोठे पोस्टर फाडले, कार्यकर्ते उतरले रस्त्यावर
YS Jagan Mohan Reddy
YS Jagan Mohan Reddy

पुत्तूर : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस जगनमोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या फ्लेक्सची मोडतोड केल्यानंतर आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) पुत्तूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. पुत्तूर शहरात जगनमोहन रेड्डी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भलामोठा फ्लेक्स लावण्यात आला होता. हा फ्लेक्स अज्ञात व्यक्तींनी फाडला. त्यावरुन शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (YS Jagan Mohan Reddy Birthday)

YS Jagan Mohan Reddy
गणवेश स्वातंत्र्याचा विद्यार्थिनींकडून जल्लोष

मिळालेल्या माहितीनुसार नागरीचे आमदार आर. के. रोजा आणि त्यांच्या समर्थकांनी रविवारी रात्री अंबेडकर चौकात मोठा फ्लेक्स लावला. यावर रोजा आणि स्थानिक नेत्यांचे फोटो होते. मात्र पहाटेच्या वेळी हा फ्लेक्स फाडण्यात आल्याचे निदर्शनास आले. यानंतर वाएसआर काँग्रेस पक्षाच्या (YSR Congress) कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलिस स्टेशनवर एकच गर्दी केली.

YS Jagan Mohan Reddy
दिल्लीत ‘पॉवर रोड’ च्या नामांतराची मागणी

कार्यकर्त्यांच्या या गर्दीमुळे तिरुपती - चेन्नई राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोळंबली. कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोस्टर वॉरचे कारण हे वाएसआर पक्षातील गटबाजी असल्याचे समोर आले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की शहरातील पक्ष कार्यकर्ते दोन गटात विभागले आहेत. पुत्तूरचे डेप्युटी एसपी टी. डी. यशवंत यांनी सांगितले की या प्रकरणी गुन्हा नोंद करुन घेतला आहे आणि तपास सुरु आहे.

यशवंत म्हणाले 'मोठा फ्लेक्स फाडतेवेळी कार्यकर्त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा पूर्णपणे ब्लॉक केला होता. त्यामुळे हा फ्लेक्स कोणी फाडला याचा शोध घेणे अवघड आहे. फ्लेक्स फाडताना ब्लेडचा वापर केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com